Saturday, March 10, 2007

फ्लोरेंन्स

फ्लोरेंन्स शहराच्या प्रत्येक चॊकात आणि पार्किंगच्या बाजुला वरिल सारखे स्टाचुज उभारलेले असतात. वेगवेगळे आणि वेगवेगळ्या पोजेस मधे पाहुन हे स्टाचुज कसे तयार केले असतील व कसे उभारले असतील याचे आश्चर्य वाटते आणि आपण त्यांकडॆ बघतच रहातो.
फ्लोरेंन्स शहराच्या मधुन जाणाय्रा हायवेच्या बाजुला वरिल कारंजे आहे. एखाद्या हायवेच्या बाजुला इतके छान आणि इतके मेन्टेन केलेले कारंजेसुधा असु शकते याची कल्पना तरी करवते का ?
वरील दोनही फ़ोटोस एका फ़िशिंग शो मधील आहे. ईटालीत अशा प्रकारचे एकाच हेतुला धरुन मोठे शोज अरेंज केल्या जातात. या शो-मधे फ़िशिंग कसे करावे या एका गोष्टीपासुन कोणकॊणती साहित्यॆ लागतात व ती कशी वापरावीत याची सर्व माहिती इथॆ पुरवली जात होती, परंतु इटालीयन भाषेमधे. मला इटालीयन भाषा यॆत नसल्यामुळे मी फ़क्त इथे एक फ़ेरफ़टका मारुन आलो.
फ़्लोरेंन्स मधे मी गेलो तेंव्हा पाउस पडत होता. ईथे एका डिवाइडर वर उभा राहुन काढलेला हा फ़ोटो.
फ़्लोरेंन्स शहराच्या मधोमध उभारलेला हा मनोरा आहे. या मनो-याचे नाव ‘पीझा डेल कपीतोलो’ आहे. या मनो-याच्या सगळ्यात उंच टोकाला जाण्यासाठी ४१४ पाय-या चढुन जावे लागते. हा मनोरा फ़्लोरेंन्स शहरावर चहु बाजुंनी नजर ठेवण्यासाठी पुरातन काळात बनवलेला असावा असे वाटते. मी, हा मनोरा चढुन जेंव्हा वरच्या टोकाला गेलो तेंव्हा पुर्ण धुकं पसरलेलं होतं, आणि अंग गोठवणारा थंड गार वारा वहात होता. मी जर का साहित्तीक असतो तर नक्की काहीतरी झक्कस लिहिलं असतं. आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी एकटं न गेलेलंच बरं, कोणालातरी बरोबर घेउन गेलं तर उत्तमच.
फ़्लोरेंन्स शहराच्या मधोमध असलेल्या मनो-यावरुन दिसणारे रमणीय द्रुष्य. दुर तिथे त्या कोप-याला क्शितिज दिसते आहे आणि इतके काळे ढग जमा झाले आहेत की, थोड्याच वेळात धो-धो पाउस पडतो का काय असा भास होतो. थंड गार वारा अंगाला झोंबणारा, कोणाचीतरी खास आठवण करुन देणारा वाहतो आहे. इथे पोहोचल्यावर जर का तुम्हाला तुमच्या खास व्यक्तीची आठवण नाही झाली तर नवलंच.